शेती परवडत नाही

  • 3.2k
  • 1.9k

शेती परवडत नाही? *आज शेतकऱ्यांची हालत अगदी दयनीय आहे. बरेचसे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्याचं कारण म्हणजे शेती न पिकणे. शेतीत पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन न झाल्यानं जी बिकट परिस्थिती निर्माण होते. ती सहन न झाल्यानं शेतकरी आत्महत्या करीत असतात. कारण शेती पिकवायला पैसा लागतो. बियाणे घ्यायला व ते रुजवायला पै पै पैसा लागतोच. एवढंच नाही तर ते बियाणे अंकुरीत झाले की त्या अंकूराची पुढे रोपे होईपर्यंत आणि पुढं त्याला फुल लागेपर्यंत पैसा लागतो आणि अशावेळेस एखाद्या वेळेस ओला दुष्काळ वा सुका दुष्काळ पडला की बस. शेतकरी हवालदिल होतो. कारण उभी रोपं कोलमडून पडलेली असतात. त्यातच शेतकरी आत्महत्या घडत असतात.