साक्षरतेची बोंबाबोंब; काम महत्वाचे भाऊराव एक ग्रामीण भागातून शहरात आलेला व्यक्ती. त्याचं संपूर्ण शिक्षण हे ग्रामीण भागात झालं होतं. त्याला शिक्षणाबाबत तळमळ होती. कदाचित तो ग्रामीण भागात राहात असल्यानं त्याला चांगलं शिक्षण मिळालं नव्हतं नव्हे तर पुरेशा सोयी नसल्यानं त्याला उच्च शिक्षणही घेता आलं नव्हतं. त्यातच आज त्याला वाटत होतं की ग्रामीण भागातील मुलं शिकायला हवी. भाऊराव जेव्हा लहान होता. तेव्हा त्याचे शिक्षकही त्याला शिकवीत नव्हतेच. ते शिक्षक रोजच काहीतरी लिहितांना दिसत असायचे. मुलांचा वेळ मग गोष्टी करण्यात जात असे किंवा दंगामस्ती करण्यात जात असे. परंतू भाऊरावच्या मनात शिकायची इच्छा असल्यानं तो कसाबसा शिकला व शहरातील एका मोडक्या तोडक्या शाळेत