शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी........ शेती........शेती आमची माऊली आहे. तिला आपल्या आईगत जपायला हवं. परंतु आपण तिला तसं जप्त नाही व तिला त्रास देत असतो. शेती आपली माऊली. आपण तिला त्रास देतो. असं म्हटल्यास कोणी म्हणेल की लेखक महाशय असं का बोलतात? आपण खरंच शेतीला त्रास तरी देतो काय? तर याचं उत्तर होय असंच आहे आणि ते खरंही आहे. आपण त्रासच देत असतो शेतीला. शेतीला गृहीत धरुन आपण कोणता बरे त्रास देतोय? याचं उत्तर देतांना मी एवढंच म्हणेल की आपण आपल्याला भरघोस उत्पादन यावं म्हणून शेतीत रोपांवर किटकनाशक फवारतो. त्यातच रासायनिक सल्फेटांची मात्रा टाकतो. ते रासायनिक सल्फेट, ज्यानं आपली शेतीमाऊली वांझ होते.