भारत महाशक्ती आहे? चांद्रयान मिशन.........भारतानं अखेर चांद्रयान मिशनमध्ये सफलता मिळवलीच व यशस्वीपणानं आपलं चांद्रयान चंद्रावर उतरवलंच. दिड २३/०८/२०२३ ला भारताचे चांद्रयान तीन या यानानं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणानं पाऊल ठेवून जगाच्या इतिहासात आपलं नाव कोरलेलं आहे. चंद्रावर जाण्याचे प्रयत्न यापुर्वी आमेरीका व रशियानं केलेले आहेत. यापुर्वी अमेरिकेनं चंद्रावर नील आम्रस्टॉंग व आल्ड्रीनला पाठवून चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. चंद्रावर रशियानं लुना २ हे यान १३ सप्टेंबर १९५९ ला पाठवून चंद्रावर जाण्याला सुरुवात केली. म्हणतात की हे यान चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं होतं. त्यानंतर अमेरिकेनं आपले अपोलो यान अंतराळात सोडले. यात अपोलो ११ या यानाला यश प्राप्त झालं व अमेरिकेनं १६ जुलै १९६९