शिक्षणाबद्दल आदर कृतीत दिसायला हवा शिक्षक.......खरं तर शिक्षक हा लोकांना शहाणा करणारा घटक. तो आहे म्हणून लोकं शहाणे बनले आहेत असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. शिक्षक हा विद्यार्थी घडविण्याचे कार्य करीत असतो. तो असे विद्यार्थी घडवतो की ज्या विद्यार्थ्याला कोणताच गंध नसतो. जेव्हा विद्यार्थी शाळेत येतात. तेव्हा त्यांना कोणत्याच सवयी नेतात नसतात. साधं शौचाला केव्हा जायचं? कसं जायचं? तेही त्याला समजत नाही. काही काही मुलं तर शौचाची क्रिया वर्गातच करुन ठेवतात. अशावेळेस त्या मुलांना समजावून सांगून त्याला उत्तूंग पातळीवर नेणे काही साधं काम नसते. ते काम शिक्षक करतो. शिक्षक खरं म्हटल्यास आपला विद्यार्थी घडवत असतो. त्यासाठी ते काय काय कसरत