मल्ल प्रेमयुद्ध - भाग 39

  • 5.2k
  • 3k

मल्ल प्रेमयुद्ध आबासाहेब शांतपणे बसले होते. त्यांच्या डोक्यावरच ओझं कमी झाल्यासारख वाटत होतं. सुलोचनाबाई आल्या."काय झालं ? शांत बसलात महान ईचारल.." आबासाहेब तरी शांत होते. "काय व बोला नव्ह... दादा न्हाय ऐकलं का? उलटसुलट बोललं का?" सुलोचनाबाई"न्हाय वो आपण लई वाईट वागलो त्यांच्याबर त्यांच्या मनातसुद्धा न्हाय अस... लोकांचं मन लै मोठं हाय...व्हय म्हणाले लग्नाला.. आता कोणतं बी विघन नक्को लवकर लवकर तयारीला लागा." तेवढयात संग्राम आले."आबा उसाचं दहा ट्रक गेलं साखरकारखान्याला मी चेक घिऊन येतो..." संग्राम लगबगीनं जायला निघाला. " थांबा संग्राम ते काय बँकेचे ऑनलाईन झाले ना ते करून दिली ना मला बँकेचे पैसे माझ्या खात्यावर ऑनलाईन जमा व्हत्यात