मर्डर वेपन - प्रकरण 9

  • 4.6k
  • 2.5k

प्रकरण ९“ मी सरकारी वकील हेरंब खांडेकर. माझ्या बरोबर आहेत इन्स्पे. तारकर, आणि रती चे वकील पाणिनी पटवर्धन, आणि त्यांची सेक्रेटरी सौंम्या सोहोनी. मला ताबडतोब तुमचे सगळे कर्मचारी इथे हजर पाहिजेत. इथे काय घडलंय याची संपूर्ण माहिती मला हव्ये.मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे ” रायबागी च्या ऑफिसात आल्या आल्याच खांडेकरांनी जोरदार आवाजात हुकूम सोडला.त्यांच्या जाडजूड देह यष्टीत आणि भरदार आवाजात अशी जादू होती की थोड्याच अवधीत त्यांनी सगळी सूत्र हातात घेतली.काही मिनिटातच सगळे कर्मचारी त्यांच्या भोवती गोळा झाले.“ इथला प्रमुख कोण आहे त्याने पुढे या.” त्यांनी हुकूम सोडला.“ मी, मी आहे.” गर्दीतून एक आवाज आला.“ पुढे या.” खांडेकर म्हणाले. “