साहित्यीकांचा पुरस्कार वल्डकपसारखाच

  • 2.9k
  • 1.1k

साहित्यिकांचा पुरस्कार वल्डकपसारखाच? साहित्यिक.......तसं पाहिल्यास देशाचे आधारस्तंभ असतात. परंतु त्यांनाही परिस्थितीनं सोडलेलं नाही. त्यांनाही कित्येक वेदनेतून जावं लागतं. तसा विचार केल्यास प्रत्येकच साहित्यीकाला भयंकर वेदनेतून जावं लागतं त्याशिवाय खरं साहित्यही जन्माला येत नाही. साहित्यिक हा जसा देशाचा आधारस्तंभ आहे. तसाच तो जगाचाही आधारस्तंभ आहे. त्याचबरोबर सृष्टीचाही निर्माता नव्हे तर भाग्यविधाता आहे. साहित्यिकाचे तसं पाहिल्यास दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे काल्पनिक साहित्य निर्माण करणारा तर दुसरा प्रकार म्हणजे वास्तविक साहित्य निर्माण करणारा. वास्तविक साहित्य तसं कल्पनेतूनही निर्माण होवू शकतं. कधीकधी एखादं साहित्य निर्माण होतं. ते वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होतं व त्यानंतर फोन येतात. त्या फोनवरुन पुढील व्यक्ती बोलतो. तो व्यक्ती सांगतो