मर्डर वेपन - प्रकरण 11

  • 4.4k
  • 2.4k

मर्डर वेपन. प्रकरण ११ सरकार पक्ष विरुद्ध रती रायबागी खटला चालू झाला.न्या. ऋतुराज फडणीस यांनी हातातला हातोडा आपटून कोर्टात जमलेल्या गर्दीला शांत करून विचारलं, “ दोन्ही बाजू तयार आहेत?” खांडेकरांचा सहाय्यक प्रियमेध चंद्रचूड उभा राहिला “ आम्ही तयार आहोत.” तो म्हणाला. “ आम्ही पण ” पाणिनी म्हणाला. “ खटला चालू करण्यापूर्वी काही गोष्टी मी आधीच स्पष्ट करू इच्छितो. वर्तमान पत्रातल्या बातम्यावरून मला समजलंय की मैथिली ने रायबागी च्या मालमत्तेवर विल नुसार हक्क सांगितला आहे तर रती ने रायबागी ची विधवा पत्नी या नात्याने हक्क सांगितला आहे. याचा निर्णय संबंधित कोर्ट घेईल,माझ्या कोर्टात रायबागी विषय चर्चिला जाता कामा नये.अर्थात खुनाचा हेतू