मर्डर वेपन - प्रकरण 16

  • 2.7k
  • 1.4k

प्रकरण १६न्या. फडणीसांनी दुसऱ्या दिवशी कोर्ट चालू होताच विचारलं, “ या सर्वांचा काय खुलासा द्याल तुम्ही खांडेकर?”“ सूज्ञा पालकर ला गर्दीच्या ठिकाणी येऊन एखादी गोष्ट करायला भीती वाटते.म्हणजे एक प्रकारचा मानसिक आजार आहे तिला.पाणिनी पटवर्धन यांनी तिची ही कमजोरी हेरून तिला मुद्दामच कोर्टात गर्दीसमोर यायला लावलं आणि आपल्या अशिलाला कसा फायदा करून घेता येईल हे पाहिलं. ” खांडेकर म्हणाले.“ मिस्टर पटवर्धन, तुमचं काय म्हणणं आहे? काही थेअरी आहे?” फडणीसांनी विचारलं.“ रायाबगी झोपेत मारला गेला, बरोबर? ” पाणिनीने विचारलं“ बरोबर.”“ मी माझी थेअरी या गृहितकावर आधारभूत ठेवली आहे की माझी अशील निर्दोष आहे.” पाणिनी म्हणाला.“ पुढे बोला.” न्यायाधीश म्हणाले.“ तो रात्री