मल्ल प्रेमयुद्धसाठेसरांबरोबर सगळे स्टुडन्ट इंटरनॅशनलच्या तयारी जोमाने लागले होते. काही करून वीरचा नंबर मिळवायचा होता कारण आबांना भेटून आल्यानंतरच घडलेला प्रकार विजयने सांगितला तेव्हापासून तिला थोडी तरी आशा होती की, वीर आपला होईल. म्हणून खेळावर कमी आणि तीच वीरकडे जास्त लक्ष होतं. साठे सरांनी दोन-तीन वेळा बजावल. "आर्या खेळावर लक्ष दे..." पण नाही प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिला वीर शिवाय काहीच दिसत नव्हतं. चुकून वीरची नजर आर्यकडे गेली. त्याच्या लक्षात येत होतं की आपल्याकडे बघती. तिच्या डोळ्यात प्रेमाशिवाय काही दिसत नव्हतं. तो स्वतःहून आर्याकडे गेला." आर्या मला तुमच्याशी बोलायचय." क्रांती आणि रत्ना तिरक्या नजरेने त्या दोघांकडे बघत होत्या.