मल्ल प्रेमयुद्ध - भाग 43

  • 5k
  • 3.1k

मल्ल प्रेम युद्धसुलोचनाबाई दरवाजा मध्येच ओवाळण्याचे ताट घेऊन वीरची वाट बघत थांबले होत्या. बाबा हॉल मध्ये येरझाऱ्या घालत होते."सुलोचनाबाई अहो आत्या वीर आले की मग बाहेर या ओवाळायला उगा कशाला खोळंबताय दरवाज्यात?"एक नजर सुलोचना बाईंनी बाबांकडे बघितले आणि परत दरवाज्याकड बघितल. तेजश्री गालातल्या गालात हसायला लागली. "आबा आत्याबाई काही ऐकणार नाय... त्या भाऊजी आल्याशिवाय काय आत येणार नायत... तुम्ही त्यांना आता काय सांगू नका" आबा आणि तेजश्री हसायला लागले." हसा बाई हसा काय आता तुमाला काय कळनारे आईची माया..." सुलोचनाबाई रागाने म्हणाल्या."अहो तुमचं गुडघे दुखतात म्हणून म्हणतोय आत येऊन बसा आल्यावर मग घ्या करून औक्षण..." तेवढ्यात आबांचा फोन वाजला वीर