मर्डर वेपन - प्रकरण 17

  • 3.9k
  • 2.2k

प्रकरण १७ सकाळी पुन्हा कोर्ट चालू झालं तेव्हा कोर्टात सूज्ञा आली नव्हती.कोर्टाने खांडेकरांना खुणेनेच काय झालं म्हणून विचारलं. “ युअर ऑनर, पोलिसांना अजून सूज्ञा सापडली नाहीये.” खांडेकर म्हणाले. “ पण आज ते तिला नक्की शोधून काढतील.” “ तुम्हाला तो पर्यंत आणखी काही साक्षीदार सादर करायचे आहेत?” न्या.ऋतुराज फडणीस यांनी विचारलं. “ नाही युअर ऑनर.” खांडेकर म्हणाले. “ युअर ऑनर , खुनी कोण असावं या बद्दल मला खात्री झाली आहे. त्यासाठी मला दोन साक्षीदारांची तपासणी करायची आहे. एक, अॅडव्होकेट भोपटकर आणि दुसरा कणाद मिर्लेकर. या दोघांच्या साक्षीतून खरा खुनी मी कोर्टासमोर हजर करेन. या दोन पैकी भोपटकर इथेच आहेत. मिर्लेकारांना कोर्टाने