गावाबाहेर असलेल्या छोट्याश्या झोपडीच दार उघडत एक एकोणीस वर्षाची मुलगी बाहेर येते.ती अगदी सावकाश झोपडीसमोरील बोराच्या झाडाच्या भोवती असलेल्या दगडी चौथऱ्यावर बसते. सूर्य मावळतीला आला असतो.ती बाजूच्या मातीत हात फिरवत त्यात फुलांचे आकार बनवत असते तोच एक छोटा मुलगा तिला हाक मारतो. "वेदिका ताई" "अरे सचू आज उशीर झाला तुला...मला वाटलं आज येणार नाही तू"....वेदिका वेदिका त्या लहान मुलाकडे बघत बोलते.साधा मळलेला ढगला कुर्ता आणि पांढर गुढग्यापर्यंत असलेल धोतर जे काहीस ओल झाल होत.खांद्यावर मासळी पकडायची जाळी