श्री अन्न-श्रेष्ठ धान्य

  • 2.2k
  • 624

श्रीअन्न-श्रेष्ठ धान्य पात्रे-1)सूत्रधार 2) देव 3)शेतकरी 4) जोंधळा 5) बाजरी 6) नाचणी 7)वरी 8)मका ( सूत्रधार येतो.हातात डफ.डफ वाजवतो...गोल गिरकी घेतो.) मी सूत्रधार, या नाटकुल्याचा आधार .बर का ! मला सांगा माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? बरोबर ओळखलात...अन्न, वस्त्र व निवारा..आपण छान उंची वस्त्रे वापरतो..टोलेजंग घर बांधतो.पण अन्ना बध्दल आपण फारसा विचार करत नाही. खाताना फक्त चव बघतो.पौष्टिक काय आहे.. शरीराला फायदेशीर काय आहे याचा विचारच करत नाही? आज आम्ही या नाटुकल्यात याचच सादरीकरण करणार आहोत ते पण गोष्टीतूनच...एक आटपाटनगर होत तिथे एक शेतकरी जगण्याला कंठाळला होता...वैतागला होता कशासाठी ते प्रत्यक्षच बघूया.. ( शेतकरी कपाळाला हात लावून बसलाय ..हातात कोयती...) शेतकरी