मल्ल प्रेमयुद्ध - भाग 51

  • 4.3k
  • 1
  • 2.4k

मल्ल प्रेमयुध्द पहाटे क्रांती प्रॅक्टिसला आल्यापासून नॉर्मल वागत होती. साठे सर तिच्याजवळ आले."तुम्ही आणि वीर अजून आठ दिवसांनी येणार होता मग काल???" "सर ओलॉम्पिकच सिलेक्शन जवळ आलंय सुट्ट्या नंतरसुद्धा घेता येत्यात आता फक्त प्रॅक्टिस करायची हाय..." क्रांती "बर पण मग तुम्ही होस्टेलवर राहता?""हो सर...""बर..."सरांना काय विचारायचं होत हे क्रांतीच्या लक्षात आलं होतं पण तिने थोडक्यात उत्तर देऊन टाळलं."पियू तुला माहितीये... वीर का आलाय परत लग्नाच्या बायकोला न घेता इथे???" आर्या क्रांतीला ऐकू जाईल अश्या आवाजात बोलत होती."का ग??? नाही माहीत..." पियू"चल आत्ता मूड नाही माझा सांगायचा पण वेळ आल्यावर नक्की सांगेन... कारण मी जाम खुश आहे." "मग चांगलीच न्यूज असणार..."