मल्ल प्रेमयुद्ध - भाग 52

  • 4k
  • 2.3k

मल्ल प्रेमयुध्दस्वप्ना आज गावाला जायला निघणार होती म्हणून आज भूषणच्या घरी ती त्याला भेटायला आली होती. आल्या आल्या तिने भूषणच्या आईला नमस्कार केला. त्यांची विचारपूस केली. भूषणच्या आईने तिचे कष्टाने खडबडीत झालेले हात तिच्या गालावरून फिरवले. भूषणच्या बहिणीने स्वप्नाला चहा आणून दिला."वैनी कधी येताय एकदाच अस झालंय..."स्वप्ना वाजणारी न्हवती ती पटकन म्हणाली"तुझा दादाने मनावर घेतलं की मी आलेच लगेच..." "व्हय न वैनी मग तूच मनव दादाला त्याला आधी माझं लग्न करायचंय न मग तुमचं पण मला माझ्या वैनीबर रहायचं हाय थोडं दिस..." भूषणची बहीण वर्षा जरा नाराजीने बोलत होती."गप ग तुला अशी घालवणार मग माझ्या बायकोला आणणार न्हायतर नणंद म्हण