मल्ल प्रेमयुद्ध - भाग 53

  • 3.9k
  • 2.3k

मल्ल प्रेमयुध्द वीर प्रॅक्टिस करत होता. त्याच्या बरोबर आज समीर होता. त्याचा सगळा राग वीर बाहेर काढत होता. साठे सर वीरकडे बघत त्याच्याजवळ आले."वीर कंट्रोल करा. तू चुकीचं खेळतोयस..." वीर ऐकत नव्हता. समीर नवीन होता त्याला अजून खेळातले डावपेच नीट माहीत नव्हते. समीर दमला होता त्याच्या तोंडातून रक्त बाहेर येत होतं. सगळेजण आजूबाजूला जमले होते. सगळेजण ओरडून वीरला हेच सांगत होते." वीर चुकीचा खेळतोय साठे सर तुम्ही थांबवा हे..." क्रांतीचा राग राग झाला होता. तीला काय करावे सुचत नव्हते. त्याला कोण कंट्रोल करणार? साठेसर वर गेले. वीरला मागे खेचले. क्रांती आणि रत्ना धावत वर गेली आणि समीरला पकडले आणि एक