मल्ल प्रेमयुध्दभूषणला वीरच वागणं विचित्र वाटत होतं. त्याने स्वप्नाला फोन केला."हॅलो स्वप्ना...""पोहचला?""पोहोचलो कधीच आता निघतोय.""भेटला का क्रांतीला बरी आहे का ती?" "ती बरी हाय हो पण वीर त्याच डोकं फिरलंय... त्याला कळत नाय तो काय करतोय.""म्हणजे?" "त्याने क्रांतीच्या मित्राला कुस्तीच्या निमित्तान बेदम मारला हो...मला कळत न्हाय जर वहिनीला सोडायचं हाय मनातल्या रागापाई तर मग नसते उद्योग कशाला?" "भूषण तो क्रांतीच्या प्रेमात आहे पण त्याच्या मनात राग इतका साठून आहे की हे त्याला कळत नाही हे त्याला जाणवत आहे पण तो व्यक्त वेगळ्या मार्गाने करतोय." "आता प्रेम करून काय फायदा? वहिनी किती दुखावली माहीत हाय का स्वप्ना.. तिच्या डोळ्यातल्या भावना जर