सीता गीत (कथामालीका) भाग १

  • 8.8k
  • 3.8k

श्रीराम व सीतादेवी वनवासातून आल्यावर जावांनी सीतेला सर्व हकिगत विचारली असतां सीतेने जे कथन केले ते म्हणजे सीता गीत. हे ओवीबद्ध आहे. कवी - मोरोपंत धन्य अशा जनक राजाला यज्ञासाठी भूमी नांगरताना मिळालेली कन्या सीतादेवी ही श्रीरामाची पत्नी झाली. जनकाची सुशिल कन्या उर्मिला लक्ष्मणाची पत्नी झाली. जनकाचा कनिष्ठ पण गुणाने श्रेष्ठ असा एक बंधु होता त्याची दुहिता (कन्या) मांडवी ही दोन्ही कुळांच्या हितासाठी भरताची पत्नी झाली, दुसरी कन्या श्रुतकीर्ती जीची कीर्ती पतिव्रताही सांगतात ती शत्रुघ्न ची पत्नी झाली. अशा रीतीने या चार भाग्यवान बहिणी एकमेकांच्या जावा झाल्या. त्यांच्यातील सुसंवाद, एकी ही वाखाणण्याजोगी होती. तिघी सात्त्विक अशा जावांनी प्रेमाने सीतेला वनवासाची