मल्ल प्रेमयुद्ध - भाग 58

  • 3.8k
  • 2k

मल्ल प्रेमयुध्दक्रांतीचा फोन वाजला. तिने आर्याचा नंबर सेव्ह करून ठेवला होता. "हीच फोन???" तरीही क्रांतीने फोन उचलला."हॅलो..""वीर कुठे?""मला काय म्हायीत?""मला माहीत आहे न ... तू जिंकून मोठा तिर मारला आहेस म्हणून तो परत तुझ्याकडे आला आहे. साधा माझा फोन उचलत नाही. आज पाच दिवस झाले तो म,ह्याशी बोलला नाही की आला नाही माझ्याकडे...""पण मग मला काय म्हायीत ते कुठे गेलेत? माझा नि त्यांनाच काहीही संबंध नाही. मी माझ्या माहेरी हाय." क्रांतीने फोन ठेवून दिला."हॅलो... हॅलो.." आर्या जोराने किंचाळली."सगळे सारखेच... 'पपा ssss 'पपाsss" आर्यांचे 'पपा पळत आले."काय झालं बेटा?" "त्याच काही समजलं का?""बाळा माणस लावलेत मी कामाला अजूनतरी कोणालाही सापडला नाही.