मल्ल प्रेमयुध्द संग्रामने भूषणला फोन केला."भूषण्या वीर घरी आलाय..""का?" "माहिती न्हाय.. काय बोलला न्हाय आला तसा रूममधी बसलाय.""बर...""तू येतोस का?""न्हाय... त्याच आयुष्य हाय मी न्हाय येणार आता... त्याच ठरवलं काय ते?""अरर...?""दादा लै ऐकलं र त्याच... मित्रत्वाच नात संपलं आमचं..""तू वाटतय तसं..?""दादा जिथं आपल्या शब्दाला किंमत व्हती ती संपली मला वाटतय मग परत अपमान करून घ्यायला का येऊ?""मला म्हायती हाय तू दुखावला हायस पण हे सुद्धा म्हायीत हाय दोघांच्या मनात एकमेकांविषयी अजूनपण तेवढीच आस्था अन प्रेम हाय.""दादा.. म्हायीत न्हाय पण आजूनपण मन दुःखी हाय... तू बोलून घे त्याच्याशी त्याच मन मोकळं व्हायला पाहिजे न्हायतर तसा तो कुणाशी बोलणार न्हाय.""म्हणूनच म्हणलं तू