मित्रांच्या संगतीनंही येवू शकतात कुसंस्कार? संस्कार.......आदर्श संस्कार.......संस्काराच्या बाबतीत कोणीही म्हणतात की माणसानं आदर्शवादी बनावे आदर्श संस्कार ठेवावे. आदर्श असावे. आदर्श, आदर्श, आदर्श......नक्कीच या शब्दाची कोणालाही चीड येईल. कारण आज आदर्शपणा तरी आहे समाजात का? तर याचं उत्तर नाही असंच येईल. आजचा समाज हा आदर्श दिसत नाही. आदर्श वाटत नाही. अन् आदर्श बनायचा विचारही करीत नाही. कारण आज अशी आदर्श बनविणारी केंद्र नाहीत. अपवाद शाळा. शाळा हे आदर्श बनविण्याचे केंद्र आहे. असे मानले जाते. तिथं संस्कार फुलवले जातात असं मानलं जातं. परंतु अलिकडील काळात शाळेनंही आपले नियम बनवले आहेत. शाळेशाळेत आज स्नेहसंमेलन होत आहेत व त्या स्नेहसंमेलनातून अलिकडे ढिंग क चिका