मल्ल प्रेमयुद्ध - भाग 62

  • 4.3k
  • 2.3k

मल्ल प्रेमयुध्दशेजारी समीर बसला होता."तू???""हो मी... तुझ्याबरोबर असायला हवं होतं असं वाटत होतं. पण तिथे येणं योग्य नव्हतं. म्हणून इथे येऊन थांबलो आणि हे बघ तिकीट पण काढले.""समीर कशाला दगदग करायची... तुझी प्रॅक्टिस बुडती ना...""हे असं अख्या रस्त्याने तू रडत बसणार हे माहीत होतं म्हणून मग मी आलो.""नाही रडत मी...""मग हे डोळ्यात भरलेलं पाणी का?""कारण ज्या माणसावर आपण निस्वार्थ प्रचंड प्रेम करतो त्याने अचानक आपल्या आयुष्यातन निघून जायचं ते पण असं... नाय रे सहन होत.""अग समोरच्यावर आपण प्रचंड प्रेम करतो पण आपल्यावर कोण प्रेम करत आणि किती? ह्याला त्यापेक्षाही जास्त महत्व असत. तेंव्हा आपण डोळे मिटून घेतलेत याला जागीच अर्थ