मल्ल प्रेमयुद्ध - भाग 65

  • 3.9k
  • 2.3k

मल्ल प्रेम युद्धरत्ना आणि क्रांती बॅग भरत होत्या. "अस कधीच झालं नाय की आठ दिवस सरांनी सुट्टी दिली. मला कायतरी गडबड वाटती." क्रांती म्हणाली."अस काय नसलं खरच त्यांचा प्रॉब्लेम असलं.""असला तरी चार दिवस ठीक हाय पण एवढे दिवस साठेसर आपले नुकसान करणार न्हाईत.""व्हय मग बोलयच का सरांबरोबर..""नको मग अस व्हईल की आपला त्यांच्यावर विश्वास न्हाय...""मग???""काय न्हाय आता गावाला जायचं अशी आपण आपलं प्रॅक्टिस सुरू ठेवतोच की...""हो आपल्याला बोलावलंय स्वप्नान लग्नाला पण दादा अन हे पाठवत्याल का लग्नाला?""अन तिथं परत तीच चर्चा नको वाटतय मला सगळं परत परत... पण न्हय गेलं तर स्वप्ना अन भूषण भाऊजीना वाईट वाटलं ... पण मी