मातीचा संशोधक - भाग 2

  • 3.4k
  • 1.5k

भाग २ कचरु शेतीवरुन घरी आला होता. कचरु जेव्हा घरी आला, तेव्हा त्याला ती न दिसल्यानं तो परेशान झाला. त्यानंतर त्यानं इकडेतिकडे फोन लावून पाहिलं. तिचा पत्ताच नव्हता. त्यानंतर त्यानं तिच्या मायबापाला व नातेवाईकालाही फोन लावून विचारलं. त्यांनीही कचरुला रागवत नकार दिला. त्यानंतर त्यानं तिची तक्रार पोलिस स्टेशनला केली होती. तसे काही दिवस गेले. रंजना आपल्या त्या फेसबुकच्या मित्रासोबत राहू लागली होती. जो ऐतखाऊ होता तिचा मित्र. त्या मित्राशी तिनं सुरुवातीलाच विवाह केला होता. तिला वाटत होतं की तो नोकरीवर आहे. म्हणूनच ती भाळली होती त्याचेवर. त्यातच तिच्याशी गोडगोड बोलून त्यानं विवाह केला खरा. परंतु वास्तविकता माहीत होताच तिनं त्याला