बालवीर - भाग 1

  • 12.6k
  • 4.6k

बालवीर नावाच्या पुस्तकाविषयी बालवीर नावाची पुस्तक वाचकांच्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. तशी कोणतीही पुस्तक का असेना, लेखक तिला बाहेर काढत असतांना असीम आनंद वाटतच असतो. तसा मलाही वाटतोय. ही माझी साहित्य जगतातील छ्यांशिवी पुस्तक असून अठ्ठावनवी कादंबरी आहे. मला कादंबरी लिहिणं आवडतं. म्हणूनच माझा कादंबरीच लिहिण्याकडे कल जास्त आहे. ही कादंबरी लिहितांना मी संदर्भ म्हणून गुगलवरुन माहिती घेतली आहे. काही लेखकांचे लेखही घेतलेले आहेत. ज्यांची नावं लिहिलेली नव्हती. त्यांची मी आधीच माफी मागतो. कारण ती नावं वा फोननंबर नसल्यानं रितसर परवानगी मागता आली नाही. फक्त ती माहिती संदर्भ म्हणून वापरलेली आहे. पुर्वी कादंबऱ्याच चालत होत्या. आता तसं नाही.