तमाशा माहिती

  • 1.5k
  • 678

तमाशा ; अलिकडे लोप पावत चाललेला प्रकार? *आज तमाशा हा प्रकार लोप पावत चाललेला असून आता या प्रकाराला जुन्या लोकांचा प्रकार असं समजलं जातं. तसाच हा प्रकार रात्रभर चालत असल्यानं कोण रात्र जागवेल असंही मनामनात बसतं. शिवाय सरकारनं माईक वाजवायला रात्री दहा वाजतानंतर बंदी घातलेली आहे. त्यानंही या प्रकाराला बंदीस्त करुन टाकलेलं आहे. त्यामुळंच त्याच्या उपयोगीतेवर प्रश्नचिन्हं उभं राहिलेलं आहे. त्यामुळं पुढील काळात हा प्रकार पुर्णतः लोप पावेल की काय ही भीती जनमाणसाला पडलेली आहे. ती भीती नाकारता येत नाही. त्यादृष्टीनेच त्याप्रकाराचा घेतलेला आढावा. लेख काहीसा माहिती संकलनातून आहे.* सतराव्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये तमाशा हा अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार अस्तित्वात आला.