मल्ल प्रेमयुद्ध - भाग 66

  • 2.4k
  • 1.3k

मल्ल प्रेमयुद्ध जेवण झाल्यावर दादा बाहेर अंगणातल्या खाटेवर बसले होते. थंडी बोचरी होती म्हणूनच खाटेच्या बाजूला शेकोटी लावली होती. क्रांती येऊन त्यांच्या बाजूला बसली."क्रांते.." दादांचा आवाज हळवा होता."दादा मी बरी हाय... माझं लक्ष आता फक्त खेळावर हाय..""लग्नाला जाणार हायस?""तुम्ही म्हणाला तर?""माझा इश्वास हाय तुझ्यावर पण इश्वासघात करू नकोस..""दादा..." क्रांती मनापासून कळवली."तर न्हाय क्रांते... आता तुझ्या आयुष्यात वादळ आलं तर मला सहन व्हणार न्हाय, आता तुझ्या बाबतीत तुझा बाप लै हळवा झालाय... आधी वाटत व्हत की, पावन समजून घेऊन घटस्फोट टाळत्याल पण न्हाय त्याच्या मनानी ठरवलं व्हत ते केलं. क्रांते त्यांना पश्चाताप झालाय हे सांगितलं मला चिनू न.. पण परत अस