मल्ल प्रेमयुद्ध लग्नाचा मुहूर्त जवळ येत होता तसतसे स्वप्नाची हुरहूर वाढत होती. स्वप्नाने हिरव्या कठाची लालबुंद कलरची नववारी साडी नेसली होती.स्वप्ना सुंदर दिसत होती. निर्या सावरत आलेली क्रांती तिच्याकडे बघतच राहिली."स्वप्ना किती सुंदर दिसतेस! हा नक्की नटल्याचा परिणाम हाय की कोणासाठी तरी आवरल्याचा परिणाम हाय." स्वप्ना आ करून क्रांतीकडे बघत बसली. " क्रांति माझ्यापेक्षा तू किती गोड दिसतेस ते बघ आधी... नारंगी कलर )च्या साडीत तुझा चेहरा तुझा रूप अजूनच खुलून दिसतंय. एक विचारू?" "विचारणा.."क्रांतीने स्वप्नाचा पदर नीट करत म्हटले." मंगळसूत्र नाही काढलस?" क्रांतीच्या डोळ्यात पाणी आलं. स्वप्ना म्हणाली, "अग तू रडावं यासाठी नाही विचारलं मी पण..."" समजलं मला तुम्हाला