मल्ल प्रेमयुद्ध पहाटे ग्राउंड वर सगळ्यांचाच एक्ससाइज सुरू होता. विरला ग्राउंड वर बघून साठे सरांना आनंद झाला. वीर पुन्हा एकदा प्रेमात बुडाल्यासारखा क्रांतीला डोळे भरून बघत. किती बघाव? आणि किती नाही हे त्याला कळत नव्हतं. स्पर्धेमध्ये "जिंकणं" यापेक्षा तिच्यासाठी जिंकाव फक्त तिच्यासाठी तिच्या इच्छेसाठी....क्रांतीला जाणवत होत की, वीर सतत आपल्याकडे बघतोय,क्रांतीच्या काळजात धस्स होत होत.ये इश्क नजरोंसे ना खेलो युं,बात बिघड जाती हें,हमें फिरसे प्यार हो जायेगा..." आता कसं सांगावं ह्यांना की बघू नका..."समीरचं लक्ष वीर कडे होतं. समीरच्या काळजात कालवा कालव होत होती. तो एकदा वीरकडे बघत होता. एकदा क्रांतीकडे बघत होता. या दोघांच्या नजरा नजरांचा खेळ समीरला सहन