मल्ल प्रेमयुद्धगाव- क्रांतीचे घररत्नाचे वडील- आई, ऋषीचे आई- वडील, दादा, आशा, संतोष ऋषी सगळे बसले होते. सगळेजण बैठकीला बसले होते."तुम्हाला इथे बोलवायच कारण तुमास्नी मी कळवलं हाय... मला वाटत माझ्या दोन्ही पोरांची लग्न लवकर व्हायला पाहिजे. यात मला कोणतच विघ्न नको...""दादा चुकीच समजू नका पण एक मुलीच्या बाबतीत अस झालं म्हणून तुम्ही घाई करताय का? ऋषीचे अजून शिक्षण होतंय आणि चिनूचे सुद्धा...आपण रत्ना आणि संतोषच्या लग्नात त्यांचा साखरपुडा करू..." ऋषीची आई म्हणाली."ताई तुमचं म्हणणं बरोबर हाय पण आता आमचा आमच्यावर इश्वास न्हाय तर कोणावर सुदा न्हाय... म्हणून अमास्नी वाटत की लग्न व्हावं.." आशा डोळ्यातले पाणी टिपत होती."बरोबर हाय ताईंचं आपण