तू सरिता..

  • 3.9k
  • 1.4k

नुकताच पाऊस पडून गेला होता.. ओलसर मातीत असंख्य छोटी छोटी पाण्याची तळी साचली होती.. अंगणात असंख्य पानांनी जमीन आच्छादून टाकली होती.. ओलसर माती, झाडांची पानगळ, पक्ष्यांचा प्रसन्न किलबिलाट.. सगळेच कसे नाविन्य पांघरलेले..शर्मिष्ठा म्हणजे अगदी पाऊस आणि समुद्रवेडी होती..समुद्राच्या लाटांचा खळखळाट तासन् तास ऐकण्यात तिला विलक्षण आनंद वाटायचा. किनाऱ्यावर रेतीत अनवाणी पायाने बसून लाटांचा आवाज ऐकत, ओल्या रेतीवर मनसोक्त चित्र विचित्र आकृत्या काढत तासन् तास बसून राहायची. अनवाणी पायाला होणारा लाटांचा स्पर्श तिला एक अवर्णनीय अशी अनुभूती देऊन जात असे. रेतीवर कोरलेल्या आकृत्या अल्लड अवखळ समुद्राची लाट कधी बागडत बागडत तर कधी सर्रकन येऊन पुसून गेल्यावर नेहमी स्वच्छंदपणे वावरणारी शर्मिष्ठा भावविभोर