शाळा... शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी...

  • 3.8k
  • 1.5k

नववी चं शेवटचं पान...शेताडी च्या रस्त्याने चालत जाताना मला खूप भरून आलं होतं कारण त्या दिवशी सगळचं संपल होतं. आता शाळेत ती मजा येणार नव्हती, कारण चित्रे कदाचित बांद्रा ला जाणार होता, फवड्या ची तर शाळा च सुटली होती, म्हात्रे तर नववी तच राहिला. आता शाळा आपली राहिलीच नव्हती कारण वर्ग बदलला म्हणून आता खिडकीतून बाहेर मैदान दिसणार नव्हतं. मांजरेकर सर सारखे शिक्षक नव्हते, माझे मित्र मला दिसणार नव्हते आणि दिसणार नव्हती ती शिरोडकर.... घरी आल्यावर आईसाहेब लगबगीनं माझ्या रिझल्ट बद्दल विचारू लागल्या. त्यांच्या आशेवर मी अर्थात पाणी फेरलं नव्हतं. पाचवा नंबर पाहून आईसाहेबांनी माझं तोंड गोड केलं. कधी नाही