किमयागार - 6

  • 2.6k
  • 1.7k

आणि पुढे काही बोलायच्या आतच तो म्हातारा वाकला व काठीने तेथील वाळूवर लिहू लागला. आणि अचानक त्या म्हाताऱ्याच्या छातीवर काही तरी चमकले , त्या प्रकाशाने मुलाचे डोळे दिपले. त्या म्हाताऱ्याने अगदी तरुणाच्या चपळाईने आपल्या कोटाने सर्व झाकून टाकले. मुलाचे डोळे उघडले तेव्हा त्याला वाळूवरील शब्द दिसू लागले. वाळूवर त्याच्या आई वडिलांचे नाव लिहीले होते. त्याच्या विद्यालयाचे नाव होते एवढेंच नव्हे तर त्याला स्वतःलाही माहित नसलेले त्या व्यापाऱ्याच्या मुलीचे नावही होते. आणि अशा काही गोष्टी होत्या ज्या तो आजपर्यंत कोणाजवळ बोलला नव्हता. मी सालेमचा राजा आहे असं म्हातारा म्हणाला होता ते त्याला आठवले. "एक राजा माझ्यासारख्या मेंढपाळाशी का बोलेल " त्याने