लकडी शिवाय मकडी…

  • 3.5k
  • 1.4k

लकडी शिवाय मकडी... एका ठराविक वयानंतर त्यातल्या त्यात नोकरीतून रिटायरमेंटनंतरचे जीवन शांत निवांत असावे असे साधारणपणे प्रत्येकाला वाटते.आपणही निवृत्तीनंतर कसे जगायचे याबद्दल माझेही स्वतःचे असे काही नियोजन होते. जवळपास मी ठरवल्याप्रमाणेच आमची सध्याची जीवनशैली आहे.सकाळी ठराविक वेळेला उठणे, माफक व्यायाम,प्राणायाम,सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेला फिरणे,समवयस्क लोकांना भेटणे, गप्पाटप्पा, वेळच्या वेळी नाश्ता,जेवण करणे. अगदी छान दैनंदिनी आहे आमची!सरकारी पेन्शन असल्यामुळे ना आर्थिक ताण ना कुठली जबाबदारी, यामुळे एक सुखी समाधानी जीवनाचा अनुभव घेत असतानाच एखादी घटना, एखादी व्यक्ती अचानक अर्थाअर्थी तसा काहीही संबंध नसताना, म्हटलं तर अगदी किरकोळ कारणाने या शांततेचा भंग करते... नाही म्हटले तरी माणूस डिस्टर्ब होऊन जातो. लोकांच्या