किमयागार - 10

  • 1.9k
  • 1
  • 1.1k

मेंढपाळ गोष्ट ऐकून काहीच बोलला नाही. त्याला राजाने सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ कळला होता. मेंढपाळ कितीही प्रवास करो पण त्याने त्याच्या मेंढ्यांना विसरता कामा नये. म्हाताऱ्याने मुलाचे हात हातात घेतले नंतर त्याच्या डोक्यावरून हात फिरवला व तो मेंढ्यांना घेऊन गेला. तरिफाच्या एका टोकाला 'मुर' लोकांनी बांधलेला एक किल्ला आहे. किल्ल्यावरून अफ्रिकेची झलक दिसते.सालेमचा राजा (म्हातारा) त्या किल्ल्यावरील भिंतीवर बसला होता. त्याच्या बाजूला असलेल्या मेंढ्या नवीन मालकाकडे थोड्या बुजल्या असल्या तरी त्याना बदल कळत होता.राजाने एक छोटे जहाज बंदरातून बाहेर पडताना दिसले, त्याच्या मनात आले आता तो मुलगा त्याला कधीच भेटणार नव्हता. मुलाच्या मनात आले की आफ्रिका खुप वेगळी आहे. तो एका