बंद दरवाजा

  • 5.7k
  • 2k

बंद दरवाजा हर्षदा घाईघाईने जीना चढली. तिने दरवाजा वाजवला.पण आतून प्रतिसाद आला नाही. ती थोडी घाबरली. सत्यभामा आजी आजारी तर नाही ना? असा प्रश्न तिला पडला.तीने पुन्हा दरवाजा वाजवला. " येते ग बाई..जरा धीर धर." आतून आजीचा आवाज आला. हर्षदाच्या जीवात जीव आला.संथ पावलांचा आवाज जवळ येत गेला.दरवाजा उघडला. आज हर्षदाला आजीचा चेहरा थोडा मलूल वाटला.डोळे ओढल्यासारखे वाटत होते. " आजी , बर वाटत नाही का? रात्री झोप लागली नाही का?" " मला काय धाड भरलीय? काल झोप लागेना.. उगाचच भूतकाळ आठवू लागला..त्या गोड-कडू आठवणीत