किमयागार - 13

  • 3.5k
  • 1.9k

किमयागार भाग १३मुलगा म्हणाला, मी दुपारी व रात्री, अगदी पहाटेपर्यंत काम करीन आणि तुमचे दुकान पूर्ण स्वच्छ करीन. तुम्ही मला पैसे द्याल त्यातून मला उद्या इजिप्तला जायचे आहे.व्यापारी हसला , तू माझ्याकडे वर्षभर काम केलेस व मी तुला क्रिस्टल विक्री चे चांगले कमिशन दिले तरी तुला इजिप्तला जाण्यासाठी कर्ज काढावे लागेल. हजारो किलोमीटर चे वाळवंट या दोन प्रदेशांदरम्यान आहे.क्षणभर तिथे सारे शहर निद्रीस्त असल्यासारखी शांतता पसरली.बाजारातील आवाज, व्यापारी व गिह्राइक यांचे बोलणे असा कोणताच आवाज येत नव्हता. कान बधीर झाले होते. आता कसलीच आशा राहिली नव्हती, ना तो राजा, ना नियती, ना पिऱ्यामिड ना खजिना.मुलगा सुन्न होऊन कॅफेच्या बाहेर बघत