किमयागार - 16

  • 2.3k
  • 1.3k

मुलगा पहाटेपुर्वीच उठला. त्याला आफ्रिका खंडात येऊन अकरा महिने नऊ दिवस झाले होते. त्याने खास या दिवसासाठी आणलेले पांढरे अरबी कपडे घातले. डोक्यावरील टोपी नीट करून त्याला उंटाच्या कातडीने बनवलेली रींगने घट्ट केली व नवीन चप्पल घालून तो पायऱ्या उतरला.सारे शहर झोपलेले होते. त्याने स्वतः साठी सॅन्डविच बनवले व क्रिस्टल ग्लास मधून चहा घेतला व नंतर अंगणात तो हुक्का पित बसला. तो शांतपणे हुक्का पित होता.मनात कोणताही विचार नव्हता, फक्त वाऱ्याचा आवाज येत होता व वाऱ्याबरोबर वाळूचा वास येत होता. नंतर त्याने खिशात हात घातला व खिशातील वस्तू चा विचार करत शांत बसला. खिशात पैशाचे बंडल होते, ते पैसे एकशेवीस