किमयागार - 19

  • 2.6k
  • 1.4k

हा एक शुभ शकुन आहे. अरब बाहेर पडल्यावर इंग्रज म्हणाला. मी योगायोग व नशीब या दोन शब्दांवर ग्रंथ लिहू शकतो. या शब्दांवर सर्वाना समजणारी अशी वैश्विक भाषा लिहिली जाते. तो मुलाला म्हणाला की, आपली भेट तुझ्या हातात उरीम थुम्मीम असतांना झाली हा फक्त योगायोग नाही. त्याने विचारले तू पण अलकेमिस्टला शोधायला चाललास का? मुलगा म्हणाला मी खजिना शोधण्यासाठी चाललो आहे. त्याला वाटले की हे आपण उगाच बोललो. पण इंग्रजाला त्यात काही विशेष वाटले नाही, तो म्हणाला मी पण एका अर्थी त्याच शोधात आहे. मुलगा म्हणाला, मला अल्केमी म्हणजे काय तेही माहिती नाही. तो असे बोलत असतानाच एक मुलगा त्यांना बाहेर