किमयागार - वाळवंट मी मेंढ्या कडून शिकलो, क्रिस्टल कडून शिकलो आणि आता मला या वाळवंटाकडून पण काही शिकायला मिळणार आहे. मुलगा विचार करित होता. वारा काही थांबत नव्हता, मुलाला तरिफामधील पहिला दिवस आठवला. तो किल्ल्यावर बसला होता आणि वारा झोंबला होता. अचानक त्याला मेंढ्यांची आठवण झाली. आताही त्या अंदालुसियाच्या मैदानात अन्नपाण्याच्या शोधात फिरत असतील. त्याच्या मनात आले , आता त्या काही माझ्या मेंढ्या नाहीत, त्या त्यांच्या नविन मेंढपाळाबरोबर रुळल्या असतील आणि कदाचित मला विसरल्या असतील. तसे असले तरी फारचं छान ! . मेंढ्यासारख्या प्राण्यांना प्रवासाची सवय असते आणि त्यांना पुढे जात राहणे समजते. त्याच्या मनात व्यापाऱ्याच्या मुलीचा विचार आला. त्याला