किमयागार - 24

  • 2.5k
  • 1.3k

किमयागार - ओॲसिसजग बऱ्याच भाषेत बोलत असते.काळ पुढे चालत असतो तसेच तांडेही. किमयागार ओॲसिसवर पोचणाऱ्या लोकांकडे व प्राण्यांकडे पाहत विचार करत होता.नविन आलेले लोक आनंदाने ओरडत होते आणि वाळवंटातील सूर्याला धुळीचे लोट झाकत होते.ओॲसिसवर असलेली मुले नवीन लोकांचे स्वागत उत्साहाने ओरडून करत होती. किमयागाराने पाहिले की, स्थानिक लोक तांडा नेत्याचे अभिनंदन करत होते. तसेच बराच वेळ संभाषण करत होते.पण हे सर्व किमयागाराच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हते. आतापर्यंत अनेक लोक वाळवंटात आलेले व गेलेले बघितले होते. पण वाळवंट तेथेचं होते. त्याने अनेक राजे व रंक या वाळवंटात फिरताना बघितले होते.वाळूचे ढिगारे वाऱ्यामुळे बदलत असतात पण तो लहान असल्यापासून वाळू मात्र तिचं होती.