किमयागार - 25

  • 2.5k
  • 1.1k

किमयागार ओॲसिसतांड्याच्या नेत्याने त्याचे पहारेकरी व इतरांना पण त्यांच्याकडील हत्यारे टोळी प्रमुखाने नेमलेल्या माणसाकडे देण्यास सांगितले.नेता म्हणाला, हा युद्धाचा नियम आहे. ओॲसिस मध्ये सैनिकांना आश्रय नाही.(संघर्ष होऊ नये म्हणून). इंग्रजाने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर बॅगेतून काढून शस्त्रे गोळा करणाऱ्याकडे दिले.ते पाहून मुलाला आश्चर्य वाटले, त्याने विचारले रिव्हॉल्व्हर कां दिले?. इंग्रज म्हणाला त्यामुळे एकमेकांवरील विश्वास वाढतो.मुलाच्या मनात खजिन्याविषयी विचार चालू झाले होते. तो त्याच्या स्वप्नाच्या जेवढा जवळ जात होत होता, तेवढ्याच सर्व गोष्टी अवघड होत होत्या. राजा म्हणाला होता त्याप्रमाणे नविन सुरुवात करणाऱ्याचे नशीब हा सिद्धांत (अनुकुलतेचा सिद्धांत) सध्या काम करत नाही असे त्याला वाटले.त्याच्या स्वप्नपूर्तीच्या वाटचालीत त्याने अनेक परीक्षा दिल्या होत्या. अनेक