किमयागार - 27

  • 954
  • 408

किमयागार -विहिर - Girish दुसऱ्या दिवशी तरुण परत विहिरीकडे गेला . त्याला खात्री होती की फातिमा भेटेल. तेथे त्याला इंग्रज बसलेला दिसला. त्याला आश्चर्य वाटले. तरुणाकडे बघून इंग्रज म्हणाला, मी दिवसभर वाट पाहिली पण किमयागार मला आकाशात चांदण्या दिसू लागल्या तेव्हा भेटला. मी त्याला सांगितले मी तुम्हालाच शोधत इथे आलों आहे. किमयागाराने विचारले ' तू यापूर्वी कधी कोणत्या धातूचे सोने केले आहेस का?'. मी म्हणालो तेच तर शिकण्यासाठी मी आलोय. तो म्हणाला, मग तू तसा प्रयत्न केला पाहिजे. जा ! प्रयत्न कर. तरुण क्षणभर काहीच बोलला नाही. बिचारा इंग्रज इतक्या दूरवर आलाय आणि त्याला सांगितले जातेय की तू इतके दिवस