किमयागार - 28

  • 2.1k
  • 882

किमयागार -मक्तूबफातीमा म्हणाली, आणि म्हणूनच मला वाटते की, तू तुझे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा. युद्ध संपेपर्यंत थांबावे लागले तरी थांब. पण तुला आधी जायचे असले तरी तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न कर. वाळूच्या टेकड्यांचा आकार वाऱ्यामुळे बदलत असतो, पण वाळवंट बदलत नाही आणि आपल्या प्रेमाचे असेचं होणार आहे.ती पुढे म्हणाली "मक्तूब". मी जर खरेच तुझ्या स्वप्नाचा एक भाग असेन तर तू नक्कीच परत येशील.त्या दिवशी तरुणाला उदास वाटत होते. त्याच्या मनात लग्न झालेल्या मेंढपाळांबद्दल विचार येत होते. त्यांना आपल्या पत्नीला हे समजवावे लागे की त्यांना दूरवरच्या प्रदेशात जाणे आवश्यक आहे. प्रेम माणसाला एकमेकांसोबत राहाण्यास भाग पाडत असते. हे विचार त्याने फातिमाला सांगितले.फातिमा