एक कोंबडी गुन्हेगार निर्माण करु शकते अलिकडेच नाही तर पुर्वीपासून कोंबडे बकरे पालनाचा व्यवसाय आहे. त्यातच कित्येक वर्षापासून कोंबड्या बक-यांना कापून लोकं आपल्या जीभेचे चोचले पुरवीत असतात. कोंबड्यांना कापणारा वा बकरीला कापणारा गृहस्थ, त्यांना कापतांना त्या मुक्या जीवांनाही जीव असतो हे विसरतो आणि करकर कापत असतो. अशी ही कोंबडी गुन्हेगार निर्माण करीत असते असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कोंबड्या बक-याला कापणारा हा गुन्हेगार असतो. कारण ज्याप्रमाणे माणसाचा खुन करणे हा गुन्हा आहे. तसं कोंबडी बकरी कापणंही गुन्हाच आहे. परंतू असा गुन्ह्यात माणूस मरण पावला, तर त्याची नोंद होते. तशी कोंबड्या बक-याचा जीव घेणा-यांची नोंद होत नाही. आज सर्रासपणे ही जीवं