निर्वाण;दुःख निवारण्याचा मार्ग! सर्व दुःखाचं निवारण करण्याचा मार्ग म्हणजे निर्वाण. निर्वाणालाच प्रथम स्थान द्यावं. निर्वाण अवस्था प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असते. निर्वाण अवस्था. ती प्रत्येकाच्या आयुष्यात येत असली तरी लोकं त्या निर्वाणाला महत्व देत नाहीत. त्यांना तर असं वाटते की त्यांच्या आयुष्यात निर्वाणच नाही. त्याच निर्वाणाची भीती न बाळगता ती लोकं जगत असतात आणि क्रमशः दुःख प्राप्त करीत असतात नव्हे तर दुःखी कष्टी होत असतात. ते संपत्तीचा संचय करीत असतात. जी संपत्ती निर्वाणानंतर मिळत नाही वा कोणीही घेवून जात नाही. हे जीवन नश्वर असं जीवन आहे. या जीवनात जीवंतपणी शरीरात एक श्वास वास करीत असतो. तो श्वास