विद्यार्थी शिकेल, पण....... शाळा ही विद्यार्थ्यांचं भवितव्य आहे. तिथं समता असणं गरजेचं आहे. आपण जर शाळेतच विषमता पाळत असलो तर ती विषमता आपल्या वागण्यातून नक्की दिसेल. कारण जसं बीज आपण पेरतो. तेच बीज पुढंं अंकुरतं. पेरुच्या झाडाला कधीही आंबे लागत नाही. तिच ठेवण असते त्यांची. कारण निसर्गानं त्या झाडाला तसं बनवलं आहे. माणसाचंही तसंच आहे. जर एखाद्या माणसाच्या मनात कुविचार शिरलेच तर त्याच्या मनात सुविचार शिरायला वेळच लागतो. सुविचार लवकर येत नाही माणसाच्या मनात. तेच संस्काराचं आहे. शाळा हे संस्काराचं केंद्र आहे. असे असतांना सर्व विद्यार्थ्यांसमोर आपण समतेनं नजरेत आलो नाही आणि आपण जर विषमतेननं वागत असलो तर विद्यार्थी मनात