राजकीय वादळं क्षमणार कधी

  • 2k
  • 762

राजकीय वादळं क्षमणार कधी आज सामान्य माणसाला कोणी हुंगत नाही. त्याची काही इज्जत नाही असे वाटायला लागले आहे. कारण ही सामान्य जनता आहे. सामान्य जनता ही नेत्यांच्या पेक्षा अतिशय महत्वाची आहे. कारण याच सामान्य माणसांच्या भरवशावरच ते या देशात मतदानाच्या माध्यमातून निवडून येत असतात. मतदान ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट असून त्या मतदानातून दोनचार वेळा निवडून आलेले प्रतिनिधी हे दोनचार वेळा निवडून येताच बेताल वक्तव्य करीत असतात. त्या बोलण्यातूनच जास्त प्रमाणात वाद चालत असतात. असं बेताल वक्तव्य केवळ एका बाजूचीच माणसं करतात असं नाही. तर विरुद्ध भागाचीही नेतेमंडळी असं बेताल वक्तव्य करीत असतात. गतकाळात अशा बेताल वक्तव्यात काहींचा क्रमांक आघाडीवर राहतो.